Friday, January 23, 2009

काव्य क्र. १) अगतिक

हरीभक्त म्हणे हनुमान असेल अशोक वाटीकेत अगतिक

का नाही दिली आज्ञा सीतामातेस परत आणायची
"चल माते परतुन प्रभु रामचन्द्रांकड़े
हिम्मत नाही आज कोन्हात मला रोखायची"

हरीभक्त म्हणे बिभीषण सारथि बनुन हरीचा असेल अगतिक

असेल जरी माजा भ्राता रावन
पण मलाच का केले त्याच्या मृत्युचे कारण

हरीभक्त म्हणे सीता अग्नि परीक्षणात असेल अगतिक

आहे हरिभक्त मी जन्मजन्मतारिची
तरी का श्रीराम आणली वेळ ही अग्निपरीक्षणाची

हरीभक्त म्हणे अर्जुन असेल कुरुक्षेत्री अगतिक

"कसे उपटून काढू वटवृक्ष हे
ज्यांनी उमलायला शिकविले
कसे उखडून काढू हात पाय त्यांचे
ज्यानी चालायला शिकविले"

हरीभक्त म्हणे द्रोपदी असेल राज दरबारात अगतिक

कैसा प्रसंग आला अब्रू भर दरबारात ओरबाडली
पांडवांनि जबाबदारी का आज पार नाही पाडली

हरीभक्त म्हणे पांडव असतील राज दरबारात अगतिक

कैशी सोडली नशिबाने आज साथ
कुळाची अब्रू लुटली गेली आज राज दरबारात
परी नाही करता आली आंम्हास त्या गुन्ह्यावर मात

हरीभक्त म्हणे हरीच असेल कदाचित अगतिक

रोखायला रोखले असते अनर्थ मी सगळे
मग मनुष्य रूपातील अवतार मज कसा मिळे ?
कविता क्र. २) Rose Day

फुल गुलाबी चिरडून गेलीस तू
पिवळ्या फुलाचे महत्व सांगुन गेलीस तू

वाट मूर्खा सारखी पाहत राहिलो मी
प्रेम करायचे नसते हे शिकवून गेलीस तू

"गैरसमज करवून घेतलास तू "
हे सांगण्या आधीच निघून गेलीस तू

सर्वांशी मैत्री करतेस तू
सगाळ्याशी बोलतेस तू

माज्याशिच अबोला का
मलाच का दूर ठेवतेस तू ?
वात्रटिका भाग १)

१) श्री गणेशाय नमः

श्री गणेशाय लिहून
वात्रटिका लिहिण्यास सुरवात केली
योगायोगाने ती आमच्या
नव्या पर्वाची सुरवात ठरली

नाव घेउन गणरायाच
स्वागत करू नव्या पर्वाच
पर्व आहे वात्रटिकेच
मार्मिक असेल वात्रटिका प्रत्येक
आठवून सांगू आम्ही एक एक !!!!!!
वात्रटिका भाग २)

१) वृध्धाश्रम

आजी आजोबा आता दिसत नाही फार
वृध्धाश्रम हाच त्यांचा आता आधार
कारण कामात लागत नाही यांचा हातभार
म्हणुन मानायचे नाही का जन्मदात्याचे आभार ?

२) दुष्काळ

बळीराजा पाहत होता वरुणराजाची वाट
आता तरी पावसाची होइल पहाट
अशी वाट पाहून, चातकाचीही मुडली होती पाठ
पण कोण सांगणार त्याला भरणार नव्हता एकही माठ



Thursday, January 22, 2009

वात्रटिका भाग ३)


१) हुंडाबळी

हुंडाबळी ज्हाली तुजी मुलगी
तर ती सावित्रीची लेक
पण जर सुन आली रिकाम्या हाती
तर ती नालायेक ?

२) आमच पुणे

म्हणतात पुणे तेथे काय उने
येथे ओंकरेश्वरा वरही जुळतात मने
येथे रस्त्यांचे कायमच रुसने
कारन राजकार्न्यांचे पुनेकरांवर उसने
आता तरी बदला जे आहे जुने

३) छोकरी

छोकरी साठी करतात
नोकरी नावाची चाकरी
कारन नाही मिळाली छोकरी
तर कोण करेल भाकरी ?

४) फैशन

मुलींची आता विचित्र राहानी
कधी मीनी तर कधी मायक्रो मीनी
मग का नाही येणार
पुरुशांमधे तारुण्य म्हातारपनी ?
कविता क्र. १) तिचा सहवास


ती असते बरोबर तेव्हा प्रत्येक क्षण स्वच्छंदी
पण नसेल तर भासते नुसतीच माणसांची गर्दी

तिचे बोलणे म्हणजे जणु अमृतवर्षा
आणि तिच्या अबोल्यात दुश्काळाहुन वाईट दशा

ती असेल बसमधे
तर बस ही भासते पुष्पक विमान
तिचे हास्य जणू स्वर्गच
आणि ओठ म्हणजे त्या स्वर्गाची कमान

त्या ओठांचा स्पर्श सुखद अणि आगळा वेगळा
त्या स्पर्षासाठी मी ज्हालो खुळा नि बावळा

ती अप्सरा ती मेनका अणि तीच उर्वशिही
पण कधीच वाटत नाही की स्तुति तिची फार ज्हाली

तिचे प्रश्न कधी यक्षप्रश्न तर कधी हत्ती मुंगिचे कोडे
पण देऊन चालत नाही उत्तर कधी छोटे अणि थोड़े

प्रेमाला नाही लागत लोनावळा अणि खंडाळा
ती असेल बरोबर तर चालतो कोणताही घाट नीळा

ती राधा मी सावळा
ती मैना मी कावळा
ती हुशार तर मी बावळा
म्हणुन तिच्या भावाने केला मला काळा नीळा

तिला नको होता फ्लैट लहान
तिला हवा होता बंगला महान

मला नको ती जी देइल सोन्याची खान
मला हवी ती जी राखेल माज्हा स्वाभिमान