Friday, January 23, 2009

काव्य क्र. १) अगतिक

हरीभक्त म्हणे हनुमान असेल अशोक वाटीकेत अगतिक

का नाही दिली आज्ञा सीतामातेस परत आणायची
"चल माते परतुन प्रभु रामचन्द्रांकड़े
हिम्मत नाही आज कोन्हात मला रोखायची"

हरीभक्त म्हणे बिभीषण सारथि बनुन हरीचा असेल अगतिक

असेल जरी माजा भ्राता रावन
पण मलाच का केले त्याच्या मृत्युचे कारण

हरीभक्त म्हणे सीता अग्नि परीक्षणात असेल अगतिक

आहे हरिभक्त मी जन्मजन्मतारिची
तरी का श्रीराम आणली वेळ ही अग्निपरीक्षणाची

हरीभक्त म्हणे अर्जुन असेल कुरुक्षेत्री अगतिक

"कसे उपटून काढू वटवृक्ष हे
ज्यांनी उमलायला शिकविले
कसे उखडून काढू हात पाय त्यांचे
ज्यानी चालायला शिकविले"

हरीभक्त म्हणे द्रोपदी असेल राज दरबारात अगतिक

कैसा प्रसंग आला अब्रू भर दरबारात ओरबाडली
पांडवांनि जबाबदारी का आज पार नाही पाडली

हरीभक्त म्हणे पांडव असतील राज दरबारात अगतिक

कैशी सोडली नशिबाने आज साथ
कुळाची अब्रू लुटली गेली आज राज दरबारात
परी नाही करता आली आंम्हास त्या गुन्ह्यावर मात

हरीभक्त म्हणे हरीच असेल कदाचित अगतिक

रोखायला रोखले असते अनर्थ मी सगळे
मग मनुष्य रूपातील अवतार मज कसा मिळे ?

No comments:

Post a Comment