Thursday, January 22, 2009

कविता क्र. १) तिचा सहवास


ती असते बरोबर तेव्हा प्रत्येक क्षण स्वच्छंदी
पण नसेल तर भासते नुसतीच माणसांची गर्दी

तिचे बोलणे म्हणजे जणु अमृतवर्षा
आणि तिच्या अबोल्यात दुश्काळाहुन वाईट दशा

ती असेल बसमधे
तर बस ही भासते पुष्पक विमान
तिचे हास्य जणू स्वर्गच
आणि ओठ म्हणजे त्या स्वर्गाची कमान

त्या ओठांचा स्पर्श सुखद अणि आगळा वेगळा
त्या स्पर्षासाठी मी ज्हालो खुळा नि बावळा

ती अप्सरा ती मेनका अणि तीच उर्वशिही
पण कधीच वाटत नाही की स्तुति तिची फार ज्हाली

तिचे प्रश्न कधी यक्षप्रश्न तर कधी हत्ती मुंगिचे कोडे
पण देऊन चालत नाही उत्तर कधी छोटे अणि थोड़े

प्रेमाला नाही लागत लोनावळा अणि खंडाळा
ती असेल बरोबर तर चालतो कोणताही घाट नीळा

ती राधा मी सावळा
ती मैना मी कावळा
ती हुशार तर मी बावळा
म्हणुन तिच्या भावाने केला मला काळा नीळा

तिला नको होता फ्लैट लहान
तिला हवा होता बंगला महान

मला नको ती जी देइल सोन्याची खान
मला हवी ती जी राखेल माज्हा स्वाभिमान

1 comment: